शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

By नितीश गोवंडे | Updated: May 26, 2025 18:10 IST

गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला, ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत तेथे आले

पुणे: ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६५ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मांजरीतील तुकाराम तुपे नगर भागात राहायला आहेत. रविवारी (दि. २५) रात्री आठच्या सुमारास ते घरात होते. त्या वेळी घरात कोणी नव्हते. घराचा दरवाजा उघडाच होता. अचानक एक चोरटा घरात शिरला आणि त्याने त्यांच्या गुडघ्यावर कठीण वस्तूने प्रहार केला. चोरट्याने हल्ला केल्याने ते घाबरले. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत तेथे आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. घरात एकटे असलेल्या ज्येष्ठाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करत आहेत.

खराडीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले..

पादचारी महिलेच्या गळ्यातील पावणेतीन लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत एका महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५६ वर्षीय महिला चंदननगर भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री जेवण करुन रात्री सव्वा दहाच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या. खराडी रस्त्यावरील साईकृष्णा हाॅटेलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी खराडी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले पुढील तपास करत आहेत.

विमाननगर भागात महिलेचे दागिने हिसकावले..

रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याबाबत एका ५२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला विमाननगर भागात राहायला आहेत. त्या रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्या लुंकड क्लासिक सोसायटीसमोर रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरीPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिकMONEYपैसा