शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 06:08 IST

या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहोत, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी सांगितले.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेले डॉ. वीरेंद्र शरदचंद्र तावडे, शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे या तिघांना मंगळवारी (दि. १४) अटी व शर्तींसह जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली. या गुन्ह्यातील अन्य सात संशयित आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून, दोन संशयित अद्याप फरार आहेत.गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांच्या घराजवळच हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्या घटनेत गंभीर जखमी झालेले पानसरे यांचा उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी बचावल्या. याप्रकरणी १२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, त्यातील दहा जणांना अटक झाली. यापैकी सात जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित तिघांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अटक केलेले संशयित आरोपी गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती डिगे यांनी वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन मंजूर केला.

आजवर १० आरोपींना जामीन मंजूरया गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड, सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना दोन वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वीरेंद्र तावडे यांनाही जामीन मंजूर झाला होता. मात्र, फिर्यादींच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतल्याने पुन्हा तावडे यांना शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता तावडे याच्यासह काळे आणि कळसकर यांचा जामीन मंजूर झाला. त्यामुळे या गुन्ह्यात अटक झालेले सर्वच १० आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. सारंग आकोळकर आणि विनय पवार हे दोघे अद्याप फरार आहेत.

आरोपींना जामीन मिळू नये यासाठी ॲड. अमित सिंग यांनी भक्कम मुद्दे न्यायालयात मांडले होते. आवश्यक पुरावे उपलब्ध असूनही आरोपींना जामीन मंजूर होणे हे पानसरे कुटुंबीयांसाठी फारच दु:खद आणि चिंताजनक आहे. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहोत. - मेघा पानसरे

English
हिंदी सारांश
Web Title : Panasare Murder Case: Three Accused Granted Bail; All Now Out

Web Summary : Three more accused in the Govind Panasare murder case, including Dr. Virendra Tawde, granted bail. All suspects are now out on bail, leaving the family saddened. A petition in Supreme Court is being considered.
टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरे