- किरण शिंदे पुणे - सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहेत. कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत आहे. नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे.
एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली. तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजते.दरम्यान, आरोपी याच्यावर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.