संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:23 PM2019-04-06T19:23:05+5:302019-04-06T19:23:52+5:30

केजी टू पीजी माेफत शिक्षण देण्यापासून ते आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणणार अशा अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

Our manifesto is the code of the Constitution: the deprived Bahujan lead | संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी

संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी

googlenewsNext

पुणे : संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. केजी टू पीजी माेफत शिक्षण देण्यापासून ते आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणणार अशा अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या धम्मसंगिनी रमा गाेरख, पुण्याचे उमेदवार अनिल जाधव, सचिन माळी, अतुल बहाेले आदी उपस्थित हाेते. 

हा समग्र जाहीरनाम्याचा अंश असून संपूर्ण जाहीरनाम्याचे डिजीटायझेशन करुन ताे नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या जाहीरनाम्यात विविध 27 मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. सत्तेत आल्यास शिक्षणावर बजेटच्या 12 टक्के इतका खर्च करणार असल्याचे या जाहीरनाम्यात म्हंटले आहे. त्याचबराेबर सर्वांना माेफत शिक्षणाबराेबरच आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणणार असल्याचेही या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याचबराेबर लिंगायत समाजाला स्वतंत्र्य धर्माचा दर्जा, शेतकऱ्यांना माेफत वीज, आयाेग नेमून शेतकऱ्यांना शेतमालाला भाव व शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. 

लक्ष्मण माने म्हणाले, शिक्षण माेफत देणं हे सरकारचं काम आहे. आम्ही 12 टक्के बजेटची रक्कम शिक्षणावर खर्च करु. डाेनेशन बंद करुन प्रायवेट शाळांना शासनाच्या ग्रॅंटमध्ये आणणार. तसेच देशात एकाच प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही लागू करु. आरबीआय व इतर स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. शेतकऱ्यांना वर्षातून दाेनदा 6 हजार रुपयांची सबसिडी आम्ही देऊ. तसेच आरएसएस ही भारतीय संविधान, भारतीय ध्वज, राष्ट्रगीत मानत नाही. आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणून त्यांना हे मान्य करायला लावू. 
 

Web Title: Our manifesto is the code of the Constitution: the deprived Bahujan lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.