शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackrey: आमचं सरकार आलं कि दोषींवर कारवाई करू; आदित्य ठाकरे, पुणे पूरग्रस्त भागात पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:38 IST

पूरग्रस्त भागातील लोकांचा संसार वाहून गेला, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे : पुण्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यावेळी मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. त्या रात्री जलसंपदा विभागाने इशारा देऊनही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी भागातील जवळपास  चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यात झालेल्या अताेनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला.  त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहगड रोड भागातील नागरिकंना भेट दिली. तर आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी कारण्याबरोबरच तेतेहील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीसुद्धा प्रशासनावर टीका केली आहे. 

      आदित्य ठाकरे म्हणाले, पाणी सोडलं तेव्हा न सांगता सोडल गेलं. तेही कित्येक जास्त पटीने सोडलं गेलं. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी आता लोकांशी संवाद साधला. त्यांचे कपडे, घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याची योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. डोळयादेखत, नदीपात्रात राडारोडा टाकला जातोय. नदीपात्र साठी गुजरात मॉडेल वापरलं जातंय. साबरमती मॉडेल कॉपी पेस्ट करून नदी सुधार प्रकल्प करणार आहेत आहेत. हे चुकीचं वाटत आहे. यासंदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलेलं होतं. नदी सुधारला विरोध नाही पण मी स्थगिती दिली होती.  त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. या पूरपरिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेfloodपूरRainपाऊसWaterपाणीDamधरणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती