शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:48 PM

सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही....

ठळक मुद्देसाखर आयुक्तालयावर ‘कैफियत मोर्चा’: २१ जुलैैैपर्यंत मुदत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत रक्कम१५०० कोटी रुपयांची उसाची एफआरपी थकीत येणे बाकी

पुणे: ज्या सर्वसामान्य शेतक-यांच्या मतांवर आताचे सरकार निवडून आले आहे त्यांना गरीब शेतक-यांचा विसर पडला. आगामी काळात शेतक-यांची ताकद सरकारला दाखविल्याशिवाय राहणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. सरकारने उसाची एफआरपीची थकित रक्कम त्वरीत द्यावी. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांचे थेट अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात ही रक्कम जमा करावी. अन्यथा २१ जुलैनंतर एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.ऊसउत्पादक आणि दूधउत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही. १५०० कोटी रुपयांची उसाची एफआरपी थकीत येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत रक्कम आहे. दरोडेखोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या असल्याचा घणाघात  करत३० जुलै पर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला. गेल्या वर्षी उस तोडणी व वाहतुकीच्या दरात घोळ केला आहे. उस दर नियंत्रण समितीने घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल करु नये.काही साखर कारखान्यांच्या संचालकांनी गरीबांचा उस कमी दराने खरेदी केला व तोच उस पाहुण्यांच्या नावाने कारखान्यांना जादा दराने दिला,असा आरोपही खासदार शेट्टी यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ यावेळी आम्ही संयम ठेवला आहे.यापुढे शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही.१५०० कोटी रुपयांची उसाची एफआरपी येणे आहे.शेतकऱ्यांचा दोष नसताना त्रास का ? व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे.यावेळी रविकांत तुपकर,प्रकाश पोफळे,राजेंद्र ढवाण पाटील,भगवान काटे,सुरेश पाटील,सावकार मादनाईक,जालींदर पाटील,रसीका ढगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखाने