शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 13:19 IST

विविध मागण्यांसाठी पुण्यात काँग्रेसभवनसमोर 'मौनव्रत' आंदोलन

ठळक मुद्दे10 लाख इतकी संख्या असताना सरकारचे रिक्षा चालकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

पुणे: सरकारी मदतीच्या मागणीसाठी रिक्षा पंचायतीने गुरूवारी काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारावर 'मौन व्रत' आंदोलन केले. कोरोना टाळेबंदीच्या काळातील नुकसान भरपाई द्यावी यासाठी पंचायतीच्या वतीने राज्य सरकारमधील घटक पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे. 

याआधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर असेच आंदोलन पंचायतीने केले होते. गुरूवारी सकाळी १० वाजताच पंचायतीच्या रिक्षा चालक,मालक सदस्यांंनी काँग्रेस भवनसमोर ठाण मांडले. कोणत्याही घोषणा वगैरे न देता ही सर्व मंडळी काँग्रेस भवनसमोरच्या पदपथावर शांत बसून होती. दरम्यान काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड तिथे आले.  पंचायतीचे निवेदन त्यांनी स्विकारले. 

छाजेड व बागवे म्हणाले, सरकारने टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद झाला हे खरे आहे. त्या बदल्यात आता विमा रकमेत सवलत द्यावी किंवा विम्याची मुदतवाढ करून द्यावी ही पंचायतीची मागणी रास्त आहे. परिवहन मंत्री तसेच विमा कंपन्यांचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत.

पंचायतीचे नितीन पवार म्हणाले, सरकारने रिक्षा चालकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. १० लाख इतकी मोठी रिक्षा चालक मालकांची संख्या आहे. त्यांचे टाळेबंदीने मोठे आर्थिक नुकसान झाले. विम्याची मुदतवाढ देणे सरकारला सहज शक्य आहे. त्यातून रिक्षा चालक मालकांना दिलासा मिळेल. सरकारला जाग यावी म्हणून तिन्ही घटक पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तरीही सरकार काही करणार नसेल तर आता राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळauto rickshawऑटो रिक्षाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस