शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पीएमपीची बससेवा बंद करावी लागेल; इंंधन, वेतनासाठीही नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 11:58 IST

सुमारे ९० कोटी रुपये पीएमपीला मिळणे अपेक्षित असताना एक दमडीही मिळालेली नाही...

ठळक मुद्देदोन्ही पालिकांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे लवकर द्यावेत, असे आवाहन इंंधन, वेतनासाठीही पैसे नाहीत

पुणे : प्रवाशांअभावी तोट्यात सुरू असलेली पीएमपी बससेवा पैशांअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे. दोन्ही महापालिकांनी हात आखडा घेतल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, आरोग्य योजना तसेच इंधनासाठीही पैसे नाहीत. सुमारे ९० कोटी रुपये पीएमपीला मिळणे अपेक्षित असताना एक दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे दोन्ही पालिकांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे लवकर द्यावेत, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुले पीएमपीचा आर्थिक डोलारा पुर्णपणे कोसळला आहे. दि. ३ सप्टेंबरला बससेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित प्रवासी नसल्याने उत्पन्न मिळत नाही. त्यातच दोन्ही महापालिकांकडून आर्थिक मदत होताना दिसत नाही. लॉकडाऊन काळात दोन्ही पालिकांनी विविध सेवांसाठी पीएमपीचे कर्मचारी तसेच बस घेतल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही बस घेण्यात आल्या आहेत. पण त्यापोटीचे जवळपास ४८ कोटी रुपयांपैकी एक पैसाही पीएमपीला देण्यात आलेला नाही. ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे महापालिकेकडून सुमारे ३५ कोटी तर पिंपरी चिंचवड पालिकेकडून सुमारे १३ कोटी ४० लाख रुपये मिळालेले नाहीत.           दोन्ही महापालिकांना कोरोनाशी संबंधित विविध कामांसाठी पीएमपीकडून सुमारे तीन हजार कर्मचारी देण्यात आले आहेत. तसेच ऑगस्टपर्यंतच्या पाच महिन्यांत १४ हजार बस उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही सुमारे साडे सहा हजार बस देण्यात आल्या आहेत. या बसचे भाडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दोन्ही पालिकांकडून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पीएमपीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या मार्गावर केवळ २५ टक्के बस असल्या तरी प्रवाशांची संख्या एक ते सव्वा लाखांच्या जवळपास असून त्यातून सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष दैनंदिन खर्चाच्या तुलनेत हे उत्पन्न अत्यंत अल्प आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांकडून पैसे मिळाल्याशिवाय आता बससेवा तग धरू शकणार नाही, हे स्पष्ट आहे.-------------दोन्ही महापालिकांना कोविड काळात बस आणि कर्मचारी देण्यात आले. त्यापोटी एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे बस चालविणे कठीण झाले आहे. इंधन, वेतन तसेच आरोग्य योजनांसाठी पैसे नाहीत. सुमारे ९० कोटी रुपयांचे देणे आहे. रोख पैशांशिवाय डिझेल मिळत नाही. एमएनजीएल कंपनीने सीएनजीचे ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास गॅसपुरवठा थांबविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बस सेवा थांबवावी लागु शकते. दोन्ही महापालिकांनी लवकर पैसे द्यावे.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी------------------------------दोन्ही महापालिकांकडून येणे                                                                      पुणे                                 पिंपरी चिंचवडअत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या बस-             १०,९६७                           ३,०६४कर्मचारी-                                                      १,९३७                             १,११३बस भाडे                                                        ११,३३,३६,०००                 २,४५,१२,०००वेतन                                                             २०,८३,२८,७०४                ८,८२,७०,७०९जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या बस       ६,४५४                             ६,४५४भाडे                                                               ३,१८,९६,०००                 २,१२,६४,०००एकुण रक्कम                                                ३५,३५,६०,७०४                १३,४०,४६,७०९----------------------------------------------------------------------

--

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकरState Governmentराज्य सरकार