Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:59 IST2023-07-21T08:58:55+5:302023-07-21T08:59:32+5:30

महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

Order of Inquiry into Malpractice in UPSC Pre-Training Entrance Examination Mahajyoti | Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरमार्फत रविवारी (दि. १६) ही परीक्षा घेण्यात आली. महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

महाज्योतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या एजन्सीमार्फत परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये १३ हजार १८४ उमेदवारांची रविवारी राज्यातील १०२ आणि दिल्लीतील २ केंद्रांवर संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेण्यात आली आहे.

चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला. परीक्षेदरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले आहे.

Web Title: Order of Inquiry into Malpractice in UPSC Pre-Training Entrance Examination Mahajyoti