शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे योगदान मांडण्याची संधी

By admin | Updated: December 12, 2014 00:11 IST

संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे,

पुणो : संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक व तुकाराममहाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोरे निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनातर्फे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड, माजी आमदार उल्हास पवार, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संजय नहार 
उपस्थित होते. या वेळी विविध संस्थांतर्फे मोरे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
 
हा क्षण माङयासाठी एक स्वप्न आहे. सदानंद यांना लहानपणापासून वाचनांची खूप आवड होती. त्यांना लहानपणापासून प्रवचनाची आवड होती. मी त्यांच्या वाक्यरचनेतील चुका काढीत असे.
- हिराबाई मोरे, डॉ. सदानंद मोरे यांच्या मातोश्री
 
नेमाडे यांचे विधान चुकीचे
शेजवलकर म्हणाले, ‘‘साहित्य संमेलन हे एक सांस्कृतिक संमेलन आहे. या संमेलनात प्रत्येक नागरिकाने सहभागी झाले पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनीही या संमेलनात सहभागी व्हावे. सवाई गंधर्वमध्ये सहभागी होणा:या लोकांनाही ते नावे ठेवतील.’’
 
देशातील प्रांता-प्रांतांतल्या भाषांची चर्चा  व्हायला पाहिजे. विशेषत:, पंजाब आणि महाराष्ट्रामधील भाषांचा अभ्यास व्हायला पाहिजे. दोन्ही राज्यांमध्ये असणारे नाते जपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी भारतामधल्या सर्व राज्यांत मराठय़ांचे राज्य होते आणि त्या काळात इंग्रजांना मराठी भाषा शिकावी लागत असे. मराठी भाषेचे 18व्या शतकात एवढे महत्त्व असेल, तर 21व्या शतकात मराठय़ांची मराठी भाषेविषयीची काय जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मराठी भाषेचे महत्त्व खूप मोठे आहे. संतसाहित्याची संकुचित रचना आपल्या माणसांत आहे.- डॉ. सदानंद मोरे