महाराष्ट्राचे योगदान मांडण्याची संधी
By Admin | Updated: December 12, 2014 00:11 IST2014-12-12T00:11:42+5:302014-12-12T00:11:42+5:30
संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे,

महाराष्ट्राचे योगदान मांडण्याची संधी
पुणो : संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक व तुकाराममहाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोरे निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनातर्फे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड, माजी आमदार उल्हास पवार, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संजय नहार
उपस्थित होते. या वेळी विविध संस्थांतर्फे मोरे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
हा क्षण माङयासाठी एक स्वप्न आहे. सदानंद यांना लहानपणापासून वाचनांची खूप आवड होती. त्यांना लहानपणापासून प्रवचनाची आवड होती. मी त्यांच्या वाक्यरचनेतील चुका काढीत असे.
- हिराबाई मोरे, डॉ. सदानंद मोरे यांच्या मातोश्री
नेमाडे यांचे विधान चुकीचे
शेजवलकर म्हणाले, ‘‘साहित्य संमेलन हे एक सांस्कृतिक संमेलन आहे. या संमेलनात प्रत्येक नागरिकाने सहभागी झाले पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनीही या संमेलनात सहभागी व्हावे. सवाई गंधर्वमध्ये सहभागी होणा:या लोकांनाही ते नावे ठेवतील.’’
देशातील प्रांता-प्रांतांतल्या भाषांची चर्चा व्हायला पाहिजे. विशेषत:, पंजाब आणि महाराष्ट्रामधील भाषांचा अभ्यास व्हायला पाहिजे. दोन्ही राज्यांमध्ये असणारे नाते जपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी भारतामधल्या सर्व राज्यांत मराठय़ांचे राज्य होते आणि त्या काळात इंग्रजांना मराठी भाषा शिकावी लागत असे. मराठी भाषेचे 18व्या शतकात एवढे महत्त्व असेल, तर 21व्या शतकात मराठय़ांची मराठी भाषेविषयीची काय जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मराठी भाषेचे महत्त्व खूप मोठे आहे. संतसाहित्याची संकुचित रचना आपल्या माणसांत आहे.- डॉ. सदानंद मोरे