पुणे : विरोधक या निवडणुकीत प्रचारात कुठेच दिसून येत नाहीत. विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधावं लागेल.विरोधक खेकड्यासारखे पायात पाय घालून एकमेकांना संपवण्याचे काम करत आहेत. अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी विरोधकांवर केली. पुण्यात मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.बापट म्हणाले, एस पी महाविद्यालयांचे मैदान आपल्याला लाभणार मैदान आहे. 2014 ला मोदींनी येथेच सभा घेतली होती. त्यावेळी मोठं यश भाजपला मिळालं. 50 वर्षाचा काँग्रेसचा उकिरडा मोदींनी साफ केला. जगभरातून मोदींना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येत आहे.पाच वर्षात राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम युतीने केलं. केंद्र आणि राज्य सरकारने भरभरून दिलं. विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. विरोधक खेकड्यासारखे पायात पाय घालून संपवण्याचे काम ते करत आहेत. विरोधकांनी एवढे नारळ फोडले परंतु नारळाचं पाणी प्यायला काही मिळाले नाही.
विरोधक खेकड्यासारखे पायात पाय घालून एकमेकांना संपवत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:50 IST