शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुलं आणि सुनिताबाईंचे उलगडले सामाजिक पैलू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 8:57 PM

साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेता, वक्ता एवढीच केवळ पुलंची ओळख सीमित नव्हती...

ठळक मुद्दे निमित्त होते आयुकातर्फे आयोजित पुलस्त्य महोत्सवाचे...अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि विवेकवादी विचारांसाठी पुलंनी केलेले काम महत्त्वाचे

पुणे: साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेता, वक्ता एवढीच केवळ पुलंची ओळख सीमित नव्हती तर त्यांचं सामाजिक दातृत्व देखील तितकचं वाखाणण्याजोग होतं. आपल्या संवेदनशील वृत्तीतून समाज जीवनाशी बांधिलकी जपणारे महाराष्ट्राचे लाडके पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सामाजिक कामासाठी दिलेल्या योगदानाबददल  मान्यवरांनी या दोघांविषयी प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.     निमित्त होते आयुकातर्फे आयोजित पुलस्त्य महोत्सवाचे... या कार्यक्रमात पुलं आणि सुनीताबाईंनी केलेल्या सामाजिक कार्याचे पैलू उलगडण्यात आले. आयुकाचे संस्थापक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, सुनीताबाईंचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, भारतीय विद्या भवनचे नंदकुमार काकिर्डे  यांनी पुलं आणि सुनीताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला.   ‘पुलं आणि सुनीताबाई डॉ. अनिल अवचट यांचे व्यसनाधिनेविषयीचे लेख वाचून अस्वस्थ झाले. त्यांनी या संदर्भात काय करता येईल असे विचारले. त्यातून व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना पुढे आली आणि त्यांनी त्यासाठी एक लाखाची देणगी दिली. त्या देणगीच्या जोरावर मुक्तांगणची वाटचाल सुरू झाली. व्यसनमुक्ती केंद्रात तयार झालेल्या आकाशकंदिलातील  एक कंदिल दिवाळीच्या आधी पुलंच्या घरी लावला जायचा, अशी आठवण मुक्ता पुणतांबेकर यांनी सांगितली. आशय फिल्म क्लबच्या स्थापनेपासून पुलं आणि सुनीताबाई सोबत होते.  चित्रपट दाखवण्यासाठी प्रोजेक्टर घेण्यासाठी देणगी दिली. मात्र, देणगीची रक्कम लगेच देता येणार नसल्याने त्यांनी आधी पत्र दिले आणि देणगीची रक्कम सव्याज दिली, असा किस्सा जकातदार यांनी सांगितला.     माझ्या लहानपणी बनारसमध्ये राहात असताना पुलं आमच्या घरी आल्याची आठवण सांगून पुढे त्यांच्याशी असलेल्या ओळखीचे ऋणानुबंधात रुपांतर झाले, असे डॉ. नारळीकर म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि विवेकवादी विचारांसाठी पुलंनी केलेले काम महत्त्वाचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर स्वत:ची वास्तू विकून मुक्तांगण विज्ञानशोधिका उभारण्यासाठी सुनीताबाईंनी २५ लाखांचा निधी दिल्याची आठवण काकिर्डे यांनी नमूद केली. शरीरविक्रय करणाºया मुलींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पासाठी पुलं आणि सुनीताबाईंनी आर्थिक मदत केली होती. पुढे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीवेळी अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी पुलं जनआंदोलनात उतरले. शनिवारवाड्यावरील त्यांच्या सभेसाठी अफाट गर्दी झाली होती. त्यांची ती प्रतिमा आजही मनात आहे, अशी भावना चाफेकर यांनी व्यक्त केली. ------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेP L Deshpandeपु. ल. देशपांडेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेJayant Narlikarजयंत नारळीकर