शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
4
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
6
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
7
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
8
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
9
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
10
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
11
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
12
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
13
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
14
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
15
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
16
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
17
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
18
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
19
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
20
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:34 IST

भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा झाला कमी : दर्शनासाठी नागरिकांची गर्दीॅ 

भोर:  भाटघर धरणातून  सातत्याने होणा-या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. पाणी कमी झाल्यामुळे कांबरे (ता.भोर) येथे भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदीर बाहेर आले आहे. प्राचीन असलेले हे मंदीर पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील नागरीक या ठिकाणी येत आहेत.   भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्या बाहेर आले आहे. वेळवंड नदीमध्ये प्रचिन असे पांडव कालीन शिवमंदीर आहे. या मंदीराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदीराचे वैशिष्टये म्हणजे पांडवकालीन असुन ते पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. मे व जुन दोन महिनेच हे मंदीर पाण्याबाहेर असते. पुर्वी धरण नव्हते त्यावेळी मंदीराच्या जागेवर शेती होती.  दरवर्षी, पडणा-या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर वाहात असलेल्या गाळामुळे मंदीर जमिनीखाली गेले आहे. मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम असुनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडी फार मोडतोड झाली आहे. मंदीरात स्वयंभु शिवलिंग असुन तसेच पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे. 

पुर्वी मंदिरात जाताना वर चढुन जावे लागत होते. मात्र, गाळामुळे मंदिराच्या पाय-या गाडल्या गेल्या आहेत. मंदीरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे व वरील बाजुचे बांधकाम चुनखडक वाळु आणि भाजलेल्या विटात आहे. तर मंदिराच्या भीतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र, दगड साधेसुधे नसुन २० मजुरांना देखील एकत्र येऊन उचलता येणार नाहीत. इतके मोठे दगड आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करुन आयातकृती दगड एकावर एक बसवुन मंदीराची रचना केली आहे.     .........धरणात असलेले मंदीर त्याच पध्दतीने धरणाचे काठावर असावे अशी येथील नागरिकांची इच्छा असुन मंदीर बांधण्यासाठी प्रयत्न सुरु सुदाम ओंबळे व नथु सुकाळे सांगितले. --------  भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असलेले कांबरे येथीर कांबरेश्वराचे मंदीर पाण्याबाहेर आले आहे

टॅग्स :PuneपुणेDamधरणTempleमंदिर