शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेट परीक्षेसाठी तीनऐवजी दोनच पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:55 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता तीनऐवजी ३०० गुणांचे दोनच पेपर घेतले जाणार आहेत. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली आहे. नेटची परीक्षा ८ जुलै २०१८ रोजी होणार आहे. नेट परीक्षेचे वेळापत्रक...

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता तीनऐवजी ३०० गुणांचे दोनच पेपर घेतले जाणार आहेत. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली आहे.नव्या नियमानुसार नेटची परीक्षा ८ जुलै २०१८ रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल २०१८ आॅनलाइन फॉर्म भरता येणार आहेत.नेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. तसेच पूर्वी असणा-या तीन पेपरऐवजी आता दोनच पेपर असणार असून पहिला पेपर ५० प्रश्न व दुसरा पेपर १०० प्रश्न प्रत्येकी २ गुण, असे एकूण ३०० गुणांची परीक्षा होणार आहे.परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी १ तासाचा अवधी असणार आहे. तो सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेतला जाईल, तर दुस-या २०० गुणांच्या (१०० प्रश्न) पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे. तो दुपारी ११ ते १ या वेळेत घेतला जाईल. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असणार आहेत.ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीच्या वयाच्या अटीत बदललेल्या नियमांनुसार दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी ३० वर्षांपर्यंत, तर मागास प्रवर्गासाठी ३५ वर्षे वयापर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहेत.नेट परीक्षेचे वेळापत्रक-आॅनलाइन फॉर्म भरणे६ मार्च २०१८फॉर्म भरण्याची अंतिम मुदत५ एप्रिल २०१८चलन भरण्याची अंतिम मुदत६ एप्रिल २०१८यूजीसी नेट परीक्षा८ जुलै २०१८

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षा