शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कारभार अवघ्या दोन सरकारी वकिलांवरच

By admin | Updated: January 30, 2015 03:33 IST

न्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे

मंगेश पांडे, पिंपरीन्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे. पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच सरकारी वकिलांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोन सरकारी वकिलांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे दाव्यांच्या सुनावण्या पूर्ण होत नसून, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील अहल्याबाई होळकर चौकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार मोठा आहे. दररोज वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दावा सुरू होतो. शहरातील नागरिकांच्या सोईसाठी ८ मार्च १९८९ ला पिंपरीत न्यायालय उभारण्यात आले. सुरुवातीला एकच न्यायाधीश कक्ष होता. आता तीन मजली इमारतीत एकूण पाच न्यायाधीशांचे कक्ष असून, येथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे चालतात. भोसरी ठाण्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीचा दावा असल्यास त्याची सुनावणी तळमजल्यावरील न्यायाधीश कक्षात होते, तर पहिल्या मजल्यावर तीन न्यायाधीश कक्ष असून यामध्ये पिंपरी, निगडी आणि सांगवी ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी होते. तसेच दुसऱ्या मजल्यावरील कक्षात चिंचवड ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी असते. प्रत्येक कक्षात दिवसाला सुमारे दीडशे दावे सुनावणीसाठी असतात. यामध्ये बचाव पक्षाची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलांची आवश्यकता असते. त्याशिवाय सुनावणी घेता येत नाही. सरकारी वकिल हजर नसल्यास पुढची तारीख दिली जाते. यामुळे पक्षकाराला पुन्हा बोलाविले जाते. यामुळे सर्वांचाच वेळ वाया जातो. शिवाय संबंधितांना हेलपाटे मारण्याचीही वेळ येते. यासाठी प्रत्येक न्यायाधीश कक्षात एका सरकारी वकिलाची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकारी वकिलांची नेमणूक केली जात नाही.दोन सरकारी वकिलांवरच न्यायालयाचा कारभार सुरू आहे. यामुळे नागरिकांना गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे.