शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सीसीटीव्ही फुटेजवर केवळ पोलिसांची मालकी, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 5:20 AM

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात २४ तास नजर ठेवणारी १२४५ सीसीटीव्ही कॅमेºयांची सुसज्ज यंत्रणा निर्माण करणारे पुणे हे राज्यातील पहिले शहर आहे; मात्र कॅमेºयांमधून टिपले जाणारे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक कामांसाठी जनतेला उपलब्ध करून देण्यास

दीपक जाधवपुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात २४ तास नजर ठेवणारी १२४५ सीसीटीव्ही कॅमेºयांची सुसज्ज यंत्रणा निर्माण करणारे पुणे हे राज्यातील पहिले शहर आहे; मात्र कॅमेºयांमधून टिपले जाणारे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक कामांसाठी जनतेला उपलब्ध करून देण्यास पोलिसांकडून ठाम नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या फुटेजवर केवळ पोलिसांचीच मालकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सेनापती बापट रस्त्यावरील एका चौकात असलेल्या पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा व पिनशी सातत्याने छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार नेमका कुणाकडून केला जात आहे, हे समजण्यासाठी त्या चौकातील सीसीटीव्हीचे फुटेज महापालिकेतील कर्मचाºयाने माहिती अधिकारांतर्गत पोलिसांना मागितले होते; मात्र सदरची माहिती गोपनीय व सुरक्षितेच्या कारणास्तव देता येत नसल्याचे सांगून जनमाहिती अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.महापालिकेच्या कर्मचाºयांनी माहिती मागताना ती कशासाठी हवी आहे, याचे सविस्तर स्पष्टीकरण माहिती अधिकार अर्जाला जोडले होते; मात्र तरीही ही माहिती देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक उपयोगाच्या कामासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज दिले जाणार नसेल, तर कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेल्या या सीसीटीव्हीचा जनतेला काय उपयोग, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शासकीय संस्था आदी ठिकाणच्या अंतर्गत भागात लावलेल्या सीसीटीव्ही माहिती अधिकारात जनतेला सर्वत्र सहज उपलब्ध करून दिले जातात. या सीसीटीव्ही फुटेजचा अत्यंत चांगला वापर होत आहे; मात्र सार्वजनिक चौकांमधील सीसीटीव्ही फुटेज जनतेसाठी उपलब्ध करून देणे नाकारण्यात आले आहे. ते उघड केल्यामुळे गोपनीयता व सुरक्षितेला काय धोका उत्पन्न होऊ शकतो, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्षात सीसीटीव्ही बसविण्यास बराच विलंब लागला होता. टेंडर प्रक्रियेतील घोळामुळे सीसीटीव्ही बसविण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते.स्वयंसेवी संस्थांनी याचा पाठपुरावा केल्यामुळेच शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविले गेले. जनतेला या सीसीटीव्हींचा चांगला उपयोग होऊ शकेल, अशी भावना त्यामागे होते; मात्र त्यालाच पोलिसांकडून खोडा घातला आहे.खासगी फुटेज ताब्यात घेता; मगसार्वजनिक फुटेज देण्यास नकार का?विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी सोसायट्या, खासगी कार्यालये, दुकाने याठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना वेळोवेळी त्याची मदत झाली आहे. मात्र, सार्वजनिक चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज सार्वजनिक कारणांसाठी जनतेला उपलब्ध करून देण्यास पोलिसांचा नकार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सीसीटीव्ही चालू आहेत का?सार्वजनिक कामासाठी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नाही. मात्र, कदाचित संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तर पोलिसांकडून नकार दिला जात नाही ना, त्या सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर केला जाईल, अशी भीती पोलिसांना वाटत असेल तर संबंधित व्यक्तीला कार्यालयात बोलावून ते फुटेज पोलीस दाखवू शकले असते. मात्र त्याला सरसकट नकार देणे अयोग्य आहे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे