शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

अकरा मार्गांवर केवळ गर्दीच्या वेळी बस : पीएमपीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 3:21 PM

पीएमपीचे सुमारे ३५० हून अधिक मार्ग आहेत. त्यातील अनेक मार्ग तोट्यात आहेत. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी बसला प्रचंड गर्दी असते.

ठळक मुद्देसकाळी व सायंकाळीच धावणार बसबंद बस, ब्रेकडाऊन यामुळे या वेळेत प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध होत नाहीस्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन, मनपा या गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्यसर्व मार्गावर एकत्रितपणे ५० वाहक व ५० चालकांची बचत होणार ब्रोकन प्रणालीमुळे गर्दीच्या वेळी मार्गावर बस सोडणे शक्य

पुणे : गर्दीच्या वेळी कमी प्रमाणात आणि दिवसभर रिकाम्या धावणाऱ्या बसचे चित्र शहरात सातत्याने दिसते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केवळ गर्दीच्या वेळी अधिकाधिक बस प्राधान्याने मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अकरा मार्गांवर सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ही शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. या वेळेत एका मार्गावर ४ ते ५ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीचे सुमारे ३५० हून अधिक मार्ग आहेत. त्यातील अनेक मार्ग तोट्यात आहेत. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी बसला प्रचंड गर्दी असते. पण बंद बस, ब्रेकडाऊन यामुळे या वेळेत प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध होत नाहीत. याउलट दुपारी गर्दी नसतानाही बस रिकाम्या मार्गावर धावतात. त्यामुळे तोट्यात भर पडत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी तसेच गर्दीच्या वेळी प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुन्हा ‘ब्रोकन’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सकाळी व सायंकाळीच बस मार्गावर धावतात. काही महिन्यांपूर्वी ही प्रणाली बंद करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ११ मार्ग सुरू करण्यात आले आहेत. ही शटल सेवा असून प्रत्येक मार्गावर ४ ते ५ बस धावणार आहेत. त्यासाठी तोट्यातील काही फेऱ्या रद्द होतील.........स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन, मनपा या गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक बसला प्रतिदिन १० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. या बस मार्गस्थ होण्यासाठी डेपोकडून प्रथम प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. दुपारच्या वेळी या बसचे देखभाल-दुरूस्तीही करता येणार आहे. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होईल. सर्व मार्गावर एकत्रितपणे ५० वाहक व ५० चालकांची बचत होणार आहे. तसेच इंधनाचीही बचत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.............ब्रोकन प्रणालीमुळे गर्दीच्या वेळी मार्गावर बस सोडणे शक्य होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना बस उपलब्ध होते. दुपारच्या सत्रात बसची देखभाल-दुरूस्ती करणे शक्य आहे. या प्रणालीमुळे इंधन खर्चात बचत होऊन उत्पन्नही चांगले मिळते. - अनंत वाघमारे, प्रभारी वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी

..........

बसच्या वेळा सकाळी- ८ते १२  सायंकाळी- ५ ते९  ........

पहिल्या टप्प्यात सुरू झालेले ११ मार्ग १.     स्वारगेट ते कात्रज २.     स्वारगेट ते अप्पर३.     स्वारगेट ते हडपसर४.     स्वारगेट  ते धायरी५.     डेक्कन ते माळवाडी६.     डेक्कन ते कोथरूड आगार७.     पुणे स्टेशन ते हडपसर८.     पुणे स्टेशन ते वाघोली९.     पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी१०.     अप्पा बळवंत चौक ते सांगवी११.     मनपा ते बालेवाडी  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स