शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळजन्य परिस्थितीतही रोजगार हमीच्या कामावर राज्यात फक्त ६७ हजार मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:15 IST

रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत.

ठळक मुद्देजलसंधारणाची व विविध विकासाची कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सुरू विभागात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक

पुणे: राज्यात दुष्काळी स्थिती असली तरीही अद्याप रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणा-या मजूरांच्या संख्येत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. पुणे विभागात जानेवारी अखेरपर्यंत ६७ हजार ३६६ मजूर रोजगावर हमीच्या कामावर असून त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी ३ हजार २५७ आणि सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक २० हजार ६७५ मजूरांचा समावेश आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पेयजल स्त्रोतांसह भूजल पुनर्भरण करण्याबरोबरच सुक्ष्म व लघु पाटबंधा-याची कामे, सिंचन कालवे,नाली बांधणे, वन जमिनींवर सडक पट्टा, कालवा बांध, तलाव अग्रतट आणि किनारी पट्टे यावर वनरोपण, वृक्षारोपण, वृक्षलागवड आदी कामे केली जातात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर केली जाणारी जलसंधारणाची व विविध विकासाची कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सुरू आहेत.रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर  ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत. पुणे विभागात जानेवारी अखेरपर्यंत २ हजार ६६७ कामे सुरू असून ६७ हजार ३६६ मजूर काम करत आहेत. विभागात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने या जिल्ह्यात रोजगार हमीवर जाणा-या मजूरांची संख्या अधिक आहे.-------------------पुणे विभागाची रोजगार हमी योजनेच्या कामाची आकडेवारी जिल्ह्याचे नाव      मजूर उपस्थितीपुणे                ३,२५७    सातारा        १९,५०६    कोल्हापूर         १०,२०७सांगली        २०,६७५सोलापूर         १३,७१२-----------------------------

टॅग्स :PuneपुणेSangliसांगलीSolapurसोलापूरGovernmentसरकारdroughtदुष्काळ