शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पीएमपीच्या बँक खात्यात शिल्लक फक्त १० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 12:24 PM

दोन दिवसांपुर्वी पीएमपी) च्या खात्यात फक्त दहा हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे...

ठळक मुद्दे पीएमपी आर्थिक स्थिती बिकट  दरवर्षी पीएमपीचा तोटा म्हणजेच संचलन तुट काही कोटी रुपयांनी वाढतच चालला‘पीएमपी’ला प्रवासी उत्पन्नासह जाहीरात, इमारत भाडे, ठेकेदारांना दंड आदी मार्गाने उत्पन्न

- राजानंद मोरेपुणे : दैनंदिन सव्वा ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बँक खात्यात कोट्यावधी रुपयांची शिल्लक असावी, असा तुमचा समज नक्कीच असेल. काहीवेळा ही शिल्लक असतेही. पण दोन दिवसांपुर्वी या खात्यात फक्त दहा हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन उत्पन्न खात्यात जमा झाल्यानंतर त्यात वाढ होत जाईल. पण दहा तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. दरवर्षी पीएमपीचा तोटा म्हणजेच संचलन तुट काही कोटी रुपयांनी वाढतच चालला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामध्ये २०१८-१९ मध्ये तब्बल ४४ कोटी रुपयांची भर पडून हा तोटा २४४ कोटी रुपयांपर्यंत पोहचला. यंदाही त्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ‘पीएमपी’ कर्मचारी व अधिकाºयांचे वेतन दि. १ व १० असे दोन टप्प्यात होते. आॅक्टोबर महिन्याचे पहिल्या टप्प्यातील वेतन दि. १ ऐवजी ४ तारखेला देण्यात आले. वेतनासाठी पुरेसा निधी नसल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले. या वेतनानंतर पीएमपीच्या खात्यात केवळ १० हजार रुपये रक्कम शिल्लक राहिली. पुढील पाच-सहा दिवसांतच दुसºया टप्प्यातील वेतन करायचे असल्याने हा आकडा ‘पीएमपी’ अधिकाºयांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. याची कबुली एका अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. पीएमपीच्या खात्यात दैनंदिन प्रवासी उत्पन्नाची रक्कम जमा होते. महिनाभर जमा झालेल्या रकमेतून कर्मचाºयांचे वेतन दिले जाते. पण प्रत्यक्षात जमा रक्कम व खर्चाचा ताळमेळ बसविताना आता मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरूवातीला पहिल्या टप्प्यातील वेतनानंतरच केवळ १० हजार रुपये खात्यात शिल्लक राहिल्याची स्थिती उदभवली आहे. आता पुढील वेतनासाठी काही दिवसांच्या तिकीट व पास विक्रीतून मिळणाºया उत्पन्नाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच दोन्ही महापालिकांकडून संचलन तुटच्या नावाखाली पैसे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. -----------नवीन बसगाड्या वाढल्या मुळे प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवाळीनंतर तिकीट विक्रीतील उत्पन्नात चांगली वाढ दिसून आली आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही पावले उचलली जात आहेत. - अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी-------------................तिकीट व पास विक्री - सुमारे ६५ ते ७० टक्केजाहिरात - सुमारे १ टक्केदंड - सुमारे ३ ते ५ टक्केसंचलन तुट - सुमारे २५ ते ३० टक्के------------असा होतो खर्चवेतन व इतर प्रशासकीय - ५० ते ५२ टक्केइंधन - १३ ते १५ टक्केबस भाडे - २० ते २५ टक्केदेखभाल-दुरूस्ती - ५ ते ६ टक्केइतर - ३ ते ५ टक्के........आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील स्थिती -एकूण उत्पन्न - ६२१.२५ कोटी रुपयेएकूण खर्च - ८६५.८० कोटी रुपयेएकूण संचलन तूट - २४४.५५ कोटी रुपये-----------

* असे मिळते उत्पन्न‘पीएमपी’ला प्रवासी उत्पन्नासह जाहीरात, इमारत भाडे, ठेकेदारांना दंड आदी मार्गाने उत्पन्न मिळते. यापैकी सुमारे ५० टक्के खर्च कर्मचारी वेतन व इतर प्रशासकीय कारणांसाठी होतो. सुमारे १३ ते १४ टक्के खर्च इंधन, सुमारे २५ टक्के खर्च बस भाडे, ४ ते ५ टक्के खर्च देखभाल-दुरूस्तीसाठी होतो. पण प्रत्यक्ष उत्पन्न व खर्चामध्ये मोठी तफावत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून संचलन तुटीच्या नावाखाली ही रक्कम पीएमपीला दिली जाते. दरवर्षी ही तुट वाढतच चालली असल्याची स्थिती असून यंदा त्यामध्ये आणखी भर पडणार, असेच दिसते.नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी सुट्टीमुळे ‘पीएमपी’ला कमी उत्पन्न मिळाले. तसेच कर्मचाऱ्यांना बोनसही देण्यात आला. तसेच इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतन खर्चातील वाढ यामुळे खर्च वाढला आहे. बस ब्रेकडाऊनमुळे शेकडो फेºया रद्द होत आहेत. नवीन बस ताफ्यात वाढल्या असल्या तरी जुन्या बस मार्गावरून काढल्या जात आहेत. तसेच प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आहे. याचा परिणाम आता ताळेबंदावर दिसू लागला आहे.

  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे