शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

MBA Admission 2025 : आता घरबसल्या करा 'एमबीए'; प्रवेश प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:30 IST

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्राचा उपक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फत २०२५-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी; तसेच नोकरी करीत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खरी सुवर्णसंधी आहे.हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहे. विशेष म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबवला जातो. त्यामुळे घरबसल्या किंवा व्यवसाय सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार आहे. 

यात विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्याख्याने, थेट संवाद सत्रे, ई-अभ्याससामग्री, डिजिटल लायब्ररी आणि ऑनलाइन परीक्षा सुविधा पुरवण्यात येतात. हा अभ्यासक्रम चार सत्रांमध्ये पूर्ण करता येणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योगजगतातील बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करू शकतील.

इच्छुक विद्यार्थी https://cdoe.sppuef.in/MBA-Online या अधिकृत संकेतस्थळावर किंवा https://www.unipune.ac.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहेत. यात अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रवेश घेण्यात काही अडचणी आल्यास, त्यांनी केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.पात्रता१. विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे.२. खुल्या प्रवर्गासाठी किमान ५० टक्के, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता.३. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन एमबीए या माध्यमातून कमी शुल्कात उच्चशिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. - डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र