शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुणे शहरात 'सेक्स टॉईज' चा ऑनलाईन बाजार ; वर्षाकाठी होतेय कोट्यवधींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 16:28 IST

एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे. परंतु, या साईट काही ना काही शक्कल लढवित पाहिल्या जात आहेत.

ठळक मुद्देखरेदी करणाऱ्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचे, महिलांचे प्रमाण लक्षणीय

लक्ष्मण मोरे -पुणे : शहरात 'सेक्स टॉईज'चा ऑनलाईन बाजार जोमात असून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमधून हा माल पुण्यात पाठविला जात असून कुरिअर कंपन्यांमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविल्या जात आहेत. खरेदी करणाऱ्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचे असून महिलांकडून खरेदीचे प्रमाणही लक्षणीय आहे. 

एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे. परंतु, या साईट काही ना काही शक्कल लढवित पाहिल्या जात आहेत. फेसबुक आणि ट्विटर सारख्या समाज माध्यमांचा वापर करून पॉर्न साहित्य ग्राहकांपर्यंत पोचविले आहे. 'पॉर्न कंटेंट' पाहणाऱ्यांच्या मोबाईलवर 'सेक्स टॉईज' विकणाऱ्यांकडून मेसेज पाठविले जात आहेत. या मेसेजमध्ये हे साहित्य विकणाऱ्या वेबसाईटसह मोबाईल क्रमांकही दिले जातात. वास्तविक भारतामध्ये अशा प्रकारचे लिखित अथवा वास्तुरुप साहित्य विकण्यास बंदी आहे. तसेच त्याचे प्रदर्शन करणे, जाहिरात करणे यालाही बंदी आहे. परंतु, ही बंदी असतानाही या साहित्याची विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून जाहिरात केली जात आहे. संपर्काची साधने पूर्णपणे वैयक्तिक आल्याने हे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. यावर सध्यातरी पोलीस आणि शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नाही. हे साहित्य विकणाऱ्या घटकांवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची याबाबत संदिग्धता आहे. कारण, या वस्तूंच्या वैयक्तिक वापराला बंदी आल्याचे कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. --------- १. घरामध्ये सेक्स टॉईज ठेवणे गुन्हा नाही. या वस्तूंचा वापर पूर्णपणे वैयक्तिक असून तो जोपर्यंत खासगी आहे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही. त्यामुळे वैयक्तिक वापराबाबत अद्याप तरी कायदेशीर मनाई नसल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. 

२. कोणत्याही लैंगिक भावना उद्देपित करणारे, अश्लीलता प्रदर्शित करणारे साहित्य मागविणे, त्याची विक्री करणे बेकायदा आहे. कलम २९२, २९३ आणि २९४ अन्वये कारवाई केली जाऊ शकते. ३. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार पाच वर्षांची शिक्षा किंवा एक लाखांचा दंड होऊ शकतो. ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते आणि दंड देखील दोन लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. ------ पुण्यात सेक्स टॉईजचा ऑनलाईन बाजार 

स्त्री-पुरुषांच्या लैंगिक अवयवांच्या प्रतिकृतींची विक्री ऑनलाईन केली जात आहे.  स्त्री-पुरुषाप्रमाणे तयार केलेल्या नग्न बाहुल्यांनाही (डॉल) मोठी मागणी आहे. यासोबतच उत्तेजना चेतविणारे विविध प्रकारचे जेल, तेल, औषधे याचीही विक्री जोमात आहे. ------- या साहित्याची आयात मुख्यत्वे चीनमधून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे अशा 'कॉस्मोपॉलिटन मेट्रो सिटी'मध्ये या व्यवसायाने जम बसविण्यास सुरुवात केली आहे. ------- या साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचे सर्वेक्षण केले आहे. लोकांच्या लैंगिक गरजा, आवड यानुसार मार्केटमध्ये विविध सेक्स प्रॉडक्ट्स आणले जात आहेत. भारतातील २०२० मधील सेक्स टॉईजचा व्यवसाय साडेआठशे कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात येते.------- 'सेक्स टॉईज'च्या ऑनलाईन विक्रीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास थेट फोन व ईमेलद्वारे माहिती व प्रसारण मंत्रालय, सायबर गुन्हे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार देता येईल.------अश्लीलता प्रदर्शित करणारी पुस्तके, साहित्य, मजकूर, वस्तू, चित्रफिती याची जाहिरात, विक्री करण्यात येत असल्यास त्यावर कलम २९२ नुसार कारवाई केली जाते. याच कलमानुसार 'सेक्स टॉईज'च्या ऑनलाईन विक्रीवर कारवाई करता येते. सेक्स टॉईजबाबत स्पष्ट कायदा किंवा नियम लागू आहे की नाही हे तपासून पहावे लागेल. - बच्चनसिंह, उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस-------लॉकडाऊननंतर 'सेक्स टॉईज'च्या मागणीत ६५ टक्के वाढ झाली आहे. जवळपास पाच लाख प्रॉडक्ट्स विकले गेले आहेत. या साहित्याची जाहिरात करणे, प्रदर्शन मांडणे, अश्लीलता पसरविणे यासाठी कलम ९२९२ नुसार कारवाई केली जाऊ शकते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकारामध्ये हा प्रकार घडल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार कारवाई केली जाऊ शकते. - रोहन न्यायाधीश, सायबर सायकॉलॉजिस्ट आणि सायबर गुन्हे तज्ञ

टॅग्स :Puneपुणेsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडिया