Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:34 IST2025-11-06T10:33:52+5:302025-11-06T10:34:24+5:30
पुणे : भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षेचे ...

Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन
पुणे : भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा १३ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये पुणे व अमरावती विभागासाठी व सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये नाशिक व नागपूर विभागासाठी घेण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये मुंबई (कोकण) विभागासाठी, तर सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अन्य ठिकाणी असू शकते. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत उमेदवाराच्या कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या तारखेमध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.