शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांचा ऑनलाइन छळ? वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातील ऑनलाइन परीक्षेत राज्यभर तांत्रिक अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:47 IST

 दर प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन मूल्यमापनासाठी सर्व्हर डाऊन असल्याने लींक ओपन होत नसल्याने प्रशिक्षणाऐवजी ऑनलाइन कामांमध्येच शिक्षकांचा वेळ जात आहे.

बारामती - राज्यतील प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन मूल्यमापनाचा राज्यभर बोजवारा उडाला आहे, लींक ओपन होत नसल्याने शिक्षकांना ऑनलाइन मूल्यमापनाच्या नावाखाली प्रचंड त्रासाला सामोरे जाव लागत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २ जून ते १२ जून या कालावधीमध्ये १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी  व २४  वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामध्ये दर तासिकेनंतर उपस्थिती व ऑनलाईन मूल्यमापनाची सक्ती करण्यात आलेली आहे.  दर प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन मूल्यमापनासाठी सर्व्हर डाऊन असल्याने लींक ओपन होत नसल्याने प्रशिक्षणाऐवजी ऑनलाइन कामांमध्येच शिक्षकांचा वेळ जात आहे.  पहिल्या दोन्ही दिवशी या तांत्रिक बाबींमुळे शिक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.  

सुविधांचा अभावकर्मचाऱ्यांची सेवांतर्गत प्रशिक्षणे पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची असताना देखील या प्रशासनासाठी प्रत्येकी २ हजार रुपये शुल्क शिक्षकांकडून घेण्यात आलेले आहे.  तरीदेखील प्रशिक्षणा दरम्यान शिक्षकांना  चहा, अल्पोपार यांची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत प्रशासनाकडून एवढी अनास्था का? अशी चर्चा राज्यभरातील  शिक्षकांमध्ये आहे.निवड श्रेणी एक दिवास्वप्नराज्यभर शिक्षकांचे एवढ्या कठोर वातावरणामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण घेतले जात आहे.  मात्र राज्यभरात निवड श्रेणीच्या प्रस्तावांना वर्षानुवर्षे  मान्यता दिली जात नाही. अपवादात्मक काही जिल्हा परिषदा वगळता राज्यभरातील शिक्षकांना निवड श्रेणी मिळणे हे एक दिवा स्वप्न ठरले आहे.ऑनलाईन परीक्षेचा अतिरेकप्रत्येक तासिकेनंतर शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती नोंदणी व मूल्यमापन परीक्षा  अनिवार्य करण्यात आली आहे. दर तासाने उपस्थिती, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे यामुळे प्रशिक्षण स्थळावरील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये अविश्वासाची भावना तयार झाली आहे,  शिस्तीच्या नावाखाली ऑनलाईनच्या अतिरेकामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व तांत्रिक कारणामुळे प्रशिक्षणात विस्कळीतपणा येत आहे त्यामुळे मूल्यमापन ऑफलाईन करावे अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड