शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन फसवणूक; बँक खाते गोठविणार

By admin | Updated: June 25, 2015 03:37 IST

: ई-मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणारी आंतरदेशीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी

पुणे : ई-मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणारी आंतरदेशीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. या तपासात ‘लोकमत’च्या हाती लागलेले फसवणूक करणाऱ्यांचे स्टेट बँक आॅफ इंडियामधील (एसबीआय) खाते गोठविण्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने दिली.बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत फोन, एसएमएस करून फसवणुकीची अनेक प्रकरणे उजेडात येत असतानाच या फसवणुकीसाठी ई-मेलचाही वापर केला जात असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. त्यावरून आॅनलाइन पद्धतीने हजारोंचा गंडा घालणाऱ्या टोळ्या देशात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणुकीसाठी आलेल्या ई-मेलव्दारे कशी फसवणूक केली जाते, याचा तपास ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला. त्यासाठी फसवणूक करणाऱ्या कंपनींच्या व्यक्तीकडून मोबाईल क्रमांक आणि मागितलेले पैसे भरण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक मागितला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने मणिपूर राज्यातील एसबीआय बँकेचा खाते क्रमांक दिला होता. ही माहिती ‘लोकमत’ने सायबर क्राईम विभागाला दिली. त्याचा तपास करताना एसबीआयमधील हे खाते फ्रीज करण्यात येणार असल्याचे सायबर क्राईम विभागाच्या पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी सांगितले.