Pune: पुण्यात मराठी सिनेअभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक; तब्बल ३४ हजार लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:45 IST2022-03-25T18:44:56+5:302022-03-25T18:45:05+5:30
अभिनेत्रीने 20 सप्टेंबर 2021रोजी इंस्टाग्रामवर वाऊ कलेक्शन 05 या पेजवर साडी खरेदीची जाहिरात पाहून ऑनलाईन साडी खरेदी केली

Pune: पुण्यात मराठी सिनेअभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक; तब्बल ३४ हजार लुटले
येरवडा : ऑनलाइन साडी खरेदीची जाहिरात पाहून ऑर्डर केल्यानंतर प्रत्यक्षात खराब साडी मिळाल्यामुळे माहिती देण्यासाठी कॉल केल्यानंतर पैसे परत करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेऊन सिनेअभिनेत्रीची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच कल्याणीनगर येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सलीम मंडल (रा. जीधारा, दिनापूर, दक्षिन दिनापुर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठी चित्रपट व टिव्ही कार्यक्रमांमधून प्रसिद्ध असलेल्या कल्याणीनगर येथील एका अभिनेत्रीने 20 सप्टेंबर 2021रोजी इंस्टाग्रामवर वाऊ कलेक्शन 05 या पेजवर साडी खरेदी ची जाहिरात पाहिली. त्याच्यावरती वरून साडी खरेदी केल्यानंतर प्रत्येक साडीची क्वालिटी खराब असल्यामुळे त्यांनी सदर वेब पेज वर असलेल्या कस्टमर केअर नंबर वर फोन करून पैसे परत करण्यासाठी कळवले. या मोबाईल नंबर वरून कंपनीतील व्यक्तीने पैसे परत करण्यासाठी लिंक पाठवून सदरची लिंक ओपन करून त्यामधील फॉर्म भरण्यास सांगितला. ए फॉर्ममध्ये त्यांची बँक अकाउंटची माहिती तसेच इतर तपशील मागून घेतले. त्यावरून आलेल्या ओटीपी वरून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन बँक खात्यावरील रक्कम 34 हजार 998 रुपये वेगवेगळ्या ट्रांजेक्शन करून काढून घेतले. अकाउंट खात्यावरून आल्यावर त्यांनी याबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सदर व्यक्तीविरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख करीत आहेत.