शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन दाखले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 11:32 IST

विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देइयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागण्याची शक्यता

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना सहज मिळावेत,या उद्देशाने पुणे शहर तहसील कार्यालयाने ऑनलाईन दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात विविध दाखले सादर करावे लागतात. कोरोनामुळे प्रत्यक्ष महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रात जावून दाखले काढणे शक्य नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातर्फे ऑनलाइन पद्धतीने दाखले दिले जाणार आहेत.

पुणे शहर, पर्वती ,एरंडवणा, शिवाजी नगर ,औंध, बोपोडी, येरवडा, मुंढवा, घोरपडी, वानवडी व शहरातील सर्व पेठा हा भाग पुणे शहर तहसील कार्यालय अंतर्गत येतो. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांनी  http:// aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. तसेच अर्ज करताना किंवा संकेतस्थळाला काही अडचण असल्यास नागरी  सुविधा केंद्राच्या gil7022248@gmail.com या ईमेलवर  कागदपत्र पाठवावेत. तसेच अधिक  माहितीसाठी 9657759988 किंवा 7218851578 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

----------१) उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे : १) स्वघोषणापत्र २)फोटो ३) चालू वीजबिल /चालू करपावती ४) रेशन कार्ड ५) आर्थिक वर्ष २०१९-२० चे आयटीआर/  फॉर्म १६ / तलाठी यांचा चौकशी अहवाल-------२) वय ,राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी सादर करावयची कागदपत्रे :१) स्वघोषणापत्र २)फोटो ३) १० वषार्चे रहिवासी पुरावे ४) लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला ५) रेशनकार्ड /आधार कार्ड------------३) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्रासाठी  सादर करावे लागणारे कागदपत्र :१) स्वघोषणापत्र २)फोटो ३)उत्पन्नाचे स्वघोषणापत्र ४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र ५) १९६७ पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे ६)  लाभार्थी आणि वडिल यांचा शाळा सोडल्याचा दाखला ७) रेशनकार्ड /आधार कार्ड/ चालू वीजबिल /चालू करपावती ---------------४) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी सादर करावयाची कागदपत्रे : १) स्वघोषणापत्र २)फोटो ३)  लाभाथ्यार्चे जात प्रमाणपत्र ४)  लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ५)  तीन वषार्चे उत्पन्नाचे दाखले ६)रेशनकार्ड /आधार कार्ड/ चालू वीजबिल   

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ