शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभात पुरस्कारांची आॅनलाईन घोषणा

By admin | Updated: May 24, 2015 00:33 IST

काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन ‘ग्लोबल’ होणार असून, हे पुरस्कार आॅनलाईन होणार आहेत.

पुणे : काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन ‘ग्लोबल’ होणार असून, हे पुरस्कार आॅनलाईन होणार आहेत. यातून जगभरातील मराठी प्रेक्षकांना प्रभात पुरस्कारांच्या नॉमिनेशनसाठी आपले मत नोंदविणेही शक्य होणार आहे. यंदाच्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रभात पुरस्कारांचे हे तिसरे वर्षे असून, १ जून रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. यंदा या पुरस्कारासाठी २०१४ साली सेन्सॉरसंमत झालेले तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले आहेत.यामध्ये मुख्यत: ‘एक हजाराची नोट, ‘हॅपी जर्र्नी’, ‘ख्वाडा’, ‘नागरिक’, ‘सलाम’ या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे. ‘कॅँडल मार्च’, ‘रमा माधव’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपटही अनेकभागांसाठी अटीतटीच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या शर्यतीत रितेश देशमुख, आलोक राजवाडे, अतुल कुलकर्णी, सचिन खेडकर आणि सुबोध भावे आहेत. प्रिया बापट, देविका दफ्तरदार, पूजा नायक, तेजस्विनी पंडित आणि उषा नाईक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या स्पर्धेत आहेत. दिग्दर्शनाच्या पुरस्कारासाठी भाऊसाहेब कुऱ्हाडे, जयप्रद देसाई, किरण यज्ञोपवित, सचिन कुंडलकर आणि श्रीहरी साठे यांच्यात स्पर्धा आहे. १ जून रोजी निकालादिवशी ६६६.स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१.ूङ्मे या संकेतस्थळावर विभागवार क्रमाक्रमाने पुरस्कारांची घोषणा होत राहणार आहे. याशिवाय अधिक माहिती आणि ताजे अपडेटस फेसबुक आणि ट्विटरवर ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे / स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ आणि ३६्र३३ी१@स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)४प्रभात पुरस्कारचे विवेक दामले म्हणाले, ‘‘प्रभातने आपल्या चित्रनिर्मितीच्या काळातही उपलब्ध तंत्रज्ञानानुकुल वेगळे प्रयोग केले होते. याच परंपरेत बसणारा हा पुरस्कारांचाही प्रयत्न आहे.४ सामान्यत: होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यापेक्षा हा वेगळा प्रयत्न असणार आहे. हे पुरस्कार आॅनलाईन जाहीर होणार आहेत.’’