कांद्याचा भाव वाढला; पण एकरी उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:12 IST2021-02-24T04:12:34+5:302021-02-24T04:12:34+5:30
रांजणगाव सांडस : राक्षेवाडी (ता. शिरूर) येथील व परिसरातील आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती नागरगाव, वडगाव रासाई, मांडव ...

कांद्याचा भाव वाढला; पण एकरी उत्पन्न घटले
रांजणगाव सांडस : राक्षेवाडी (ता. शिरूर) येथील व परिसरातील आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती नागरगाव, वडगाव रासाई, मांडव गण फराटा आंबळे, कळवंतवाडी, अनुसे वाडी, उरळगाव या भागातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाचे पीक चांगले घेतले आहे. परंतु, यावर्षी कांदा पिकाला पाऊस, रोगराई, दुबार लागवड, याचा फटका बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले कांदा बी पावसामुळे वाया गेले व शेतात लावलेले रोपे रोगाने खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाची दुबार पेरणी करावी लागली आहे. यामुळे कांद्याचे भाव जरी वाढले असले तरी एकरी उत्पन्न मात्र घटले आहे.
कांदा बी हे ५ हजार रूपये पायली ने मिळत होते. परंतु पावसामुळे बी वाया गेल्याने शेतकऱ्यांना पुन्या लागवड करतांना कांदा बीयाणांचा तुटवडा पडला. यामुळे एक पायली कांदा बीला जवळपास १२ हजार रूपये शेतकऱ्यांना मोजावे लागले. एक एकर कांदा लागवड करण्यासाठी कांदा बी रोपे, मजूर लागवड, ट्रॅक्टर मशागत, पाणी खुरपणी, खते, औषध फवारणी यांचा खर्च मिळून एका एकराला ४० ते ५० हजार खर्च करावा लागला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना एकरी कांदा हा अडीचशे ते तीनशे बॅग उत्पन्न एका एकरातून मिळते. परंतु या वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
फोटो