शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:57 PM

शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले.

ठळक मुद्देएकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवकअचानक आवक वाढल्याने व कांद्याचा दर्जा कमी असल्याने घसरण : कांदा व्यापारी

पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयतीची धोरणामुळे दर पडण्याची भिंती व ढगाळ हावामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलो मागे ८ ते १० रुपयांनी उतरले.यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुणे बाजार समितीत कांद्याला उच्चांकी म्हणजे ३०० ते ४०० रुपये दहा किलोला दर मिळाले. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आणि पुण्यात इजिप्तचा कांदा आला देखील. परंतु सर्वसामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे  परदेशातून कांदा आयात करून देखील दरामध्ये फार फरक पडला नाही. परंतु शासनाकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जाता आहे. यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भिंत शेतकऱ्यांमध्ये आहे. तर सध्याचे ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पिक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकऱ्यांनी नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरु होण्यास पंधार ते वीस दिवस शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर विभागातून व श्रीगोंदा परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळवी कांद्याचे २०० ते २२० ट्रक आणि जुन्या कांद्याचे १५ ते २० ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्ये देखील मोठी घट झाली. सर्वसाधारण कांद्याला २७० ते २८० दर देण्यात आले. तर संगमनेर विभागातील कांद्याला २२० ते २८० , श्रींगोदा परिसरातील कांद्याला १५० ते २५० रुपये दहा किलो आणि जुन्या कांद्याला ३०० ते ३६० रुपये दहा किलो दर देण्यात आला.

दर पडण्याच्या भिंती आवक वाढलीपरदेशातून आयात करण्यात येत असलेल्या कांद्यामुळे दर पडण्याची भिंती शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक सुरु होण्यासाठी अद्याप पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी बाकी असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर व श्रींगोदा परिसरातून आवक झालेल्या कांद्यामध्ये ६० ते ७० टक्के कांदा कच्चा व अपरिपक्व कांदाच विक्रीसाठी आणला आहे. अचानक आवक वाढल्याने व कांद्याचा दर्जा कमी असल्याने कांद्याच्या दरामध्ये एकाच दिवशी आठ ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी, गुलटेकडी-मार्केट यार्ड

टॅग्स :market yardमार्केट यार्डPuneपुणेonionकांदा