तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीच्या धडकेत एकजण ठार, बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:45 IST2023-11-03T13:45:40+5:302023-11-03T13:45:59+5:30
बसच्या चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे....

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीच्या धडकेत एकजण ठार, बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
तळेगाव ढमढेरे (पुणे) : येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकजण ठार झाला. तळेगाव ढमढेरे येथे जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ दिलीप तुकाराम कुंभार हे सकाळी शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना, समोरून पुण्याहून तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी पीएमपीएमएल बसने (एमएच १२ आरएन ६१६०) धडक दिली.
बसच्या चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे. त्यांना हडपसर येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आल्याने तत्काळ त्यांच्या डोक्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी तळेगाव ढमढेरे समजल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, तीन विवाहित मुली असा परिवार आहे.