प्रत्येक दहा जणांमागे किमान एकजण थुंकतो रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:30 PM2020-03-16T23:30:00+5:302020-03-16T23:30:03+5:30

सायकलवर जाणाऱ्यांबरोबरच सिग्नलला थांबल्यावर मर्सिडीज गाडीचा दरवाजा उघडून पिंक टाकणारेही आहेत. 

One out of every ten people spit on the street | प्रत्येक दहा जणांमागे किमान एकजण थुंकतो रस्त्यावर 

प्रत्येक दहा जणांमागे किमान एकजण थुंकतो रस्त्यावर 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील सर्वेक्षण : एसएनडीटीच्या विद्यार्थिनींच्या पाहणीतील निष्कर्षहडपसरसारख्या उपनगरापासून ते शनिवार पेठेसारख्या शहराच्या मध्यभागाचा त्यात समावेश

राजू इनामदार
पुणे : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक १० वाहनांपैकी एका तरी वाहनातून रस्त्यावर थुंकले जाते. पायी जात असणाऱ्यांपैकीही प्रत्येक १० जणांमधील किमान एकजण रस्त्यावर थुंकतोच. यात सामाजिक, आर्थिक स्तराचा संबंध नाही. सायकलवर जाणाऱ्यांबरोबरच सिग्नलला थांबल्यावर मर्सिडीज गाडीचा दरवाजा उघडून पिंक टाकणारेही आहेत. 
पुण्याच्या लौकिकाला धक्का लावणारे हे निष्कर्ष फक्त वरवरचे नाहीत. २०० अभ्यासकांनी सलग ६ महिने शास्त्रशुद्ध पद्धतीने काही हजार नागरिकांची वेगवेगळ्या ठिकाणांवर पाहणी करून, ते लेखी नोंदवून त्याचा एकत्रित अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. एसएनडीटी महाविद्यालयाच्या होम सायन्स विभागाच्या विद्यार्थिनींनी हा अभ्यास केला. प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी व प्रा. ललिता भगत यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जून २०१९ ते जानेवारी २०२० या काळात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळात हे सर्वेक्षण करण्यात आले. शहराच्या वेगवेगळ्या भागांचा यात समावेश आहे. हडपसरसारख्या उपनगरापासून ते शनिवार पेठेसारख्या शहराच्या मध्यभागाचा त्यात समावेश आहे.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील पहिल्या व दुसºया वर्षाच्या २०० विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासाठी डॉ. मठकरी व प्रा. भगत यांनी एक प्रश्नावली तयार केली होती. त्यात काही निरीक्षणेही नोंदवायची होती. २५ पेक्षा जास्त प्रश्नांचा यात समावेश होता व १५ पेक्षा जास्त निरीक्षणे होती. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतेविषयीचे काही प्रश्न होते व रस्त्यावरच्या अस्वच्छतेविषयीची काही निरीक्षणे होती. विद्यार्थिनींचे गट करून त्यांना ठिकाणे देण्यात आली. तसेच ते राहत असलेल्या परिसरातही त्यांनी हे सर्वेक्षण केले.
या अभ्यासातील सार्वजनिक स्वच्छतेसंबंधीचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. सिग्नलला अनेक जण सिग्नल लाल आहे म्हणून थांबलेले नसतात, तर त्यांना तोंड मोकळे करायचे असतात म्हणून थांबतात. गाडी थांबवल्यानंतर आसपास कोणाला त्रास होईल किंवा नाही याची काळजी न घेता ते थुंकतात. महागड्या गाडीत बसलेलेही गाडी थांबवून, दरवाजा खुला करून रस्त्यावरच थुंकतात. कचरा रस्त्यावर टाकणे, नदीपात्रात भिरकावून देणे हा अनेकांना आपला हक्कच वाटतो. ‘कचरा रस्त्यावर नाही तर टाकायचा तरी कुठे?’ हा प्रश्न तर दहापैकी ९ व्यक्ती विचारतात. थुंकण्याच्या सवयीबाबत कसल्याही सामाजिक किंवा कोणत्याही स्तराचा संबंध नाही, सर्वच थरांमध्ये ही घाणेरडी सवय असलेली दिसते.
प्रा. भगत म्हणाल्या, ‘‘विद्यार्थिनींच्या अभ्यासातून हे निष्कर्ष निघतात. त्यासंबंधी आमची ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांबरोबर चर्चा झाली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर थुंकण्याच्या सवयीला आळा बसवा यासाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.’’ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सहकार्याने याविषयी जागृतीपर काही करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. एसएनडीटी, होम सायन्सचे त्यांना नेहमीच सहकार्य राहील, असे प्राचार्य डॉ. मठकरी यांनी सांगितले. 

Web Title: One out of every ten people spit on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.