दिवे घाटात टँकरच्या धडकेत दोन जण ठार; टँकर दोनशे फूट दरीत कोसळला, चालकाचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 22:33 IST2023-05-08T22:32:09+5:302023-05-08T22:33:15+5:30
लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

दिवे घाटात टँकरच्या धडकेत दोन जण ठार; टँकर दोनशे फूट दरीत कोसळला, चालकाचाही मृत्यू
लोणी काळभोर: दिवे घाटात सासवड कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकरने दोन ते तीन वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना सोमवारी (दि. ०८)रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा टँकर हा सासवड मार्गावरून पुण्याकडे निघाला असताना त्याने दुचाकींना जोरदार धडक दिली.या अपघातात कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर सुमारे दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळला आहे.या घटनेत टँकर चालक व धडक बसलेला दुचाकी चालक यांचा मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत.घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.