लोणी काळभोरमध्ये मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरुन एकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:05 IST2018-06-19T19:05:34+5:302018-06-19T19:05:34+5:30
अपहरण केलेल्या व्यक्तीने चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे समजताच चौघां आरोपींनी दोन भावांना शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली .

लोणी काळभोरमध्ये मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरुन एकाचे अपहरण
लोणी काळभोर : मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरून चार जणांनी एकाचे अपहरण केले असल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली. या घटनेत राजाभाऊ गोरोबा भुंबे ( रा. दामुनगर, कांदिवली, मुंबई ) याचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ संंजय गोरोबा भुंबे ( वय ४३, सध्या रा. भिमनगर, लोणी काळभोर. मुळ रा. डिजोळ आंबा, ता. अंबेजोगाई, जि. बीड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विराज, अनिकेत, पवन व हनु (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) या चौघांविरोधांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी १६ मे रोजी रात्री १० ३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. अपहरण केलेल्या व्यक्तीने चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे समजताच चौघां आरोपींनी दोन भावांना शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर रात्री १० - ३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राजाभाऊ याला वैदूवाडी येथे घेऊन जातो असे म्हणत त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. परंतू १८ मेपर्यंत तो घरी न परतल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन भावाचे अपहरण झाले असल्याची तक्रार दिली.