शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुळाच्या ढेपांच्या खाली चेंगरून एकाचा मृत्यु; बघ्यांनी टेम्पो केला रिकामा, पुणे सोलापुर महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:22 IST

पिकअपमध्ये असलेल्या गुळांच्या ढेपेखाली दबल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू

कुरकुंभ : कुरकुंभ येथे पुणे सोलापुर महामार्गावर गुरुवार(दि.२७)रोजी मध्यरात्री एक वाजता पिकअप वरील वाहनचालक राधेश्याम देवराम वानखेडे (वय २५) (रा. कमलापूर ता.पूर्णा, जि. परभणी) याचा वाहनवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून अपघात झाला. पिकअपमध्ये असलेल्या गुळांच्या ढेपेखाली दबल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असणारा इसम दूरवर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला आहे.

लोणी काळभोर येथून गुळ भरून बार्शीकडे जाताना कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील इटीपीच्या वळण परिसरात हा अपघात झाला. वाहन वेगात धडकल्याने दोन तीन वेळा पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान सकाळी गुळांच्या ढेपेची गाडी पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिकांनी याकडे धाव घेत मिळेल तेवढा गूळ पळवला. उशिरा येणाऱ्या काही नागरिकांच्या हाताला काहीच न लागल्याने त्यांची निराशा झाली मात्र काही जणांनी आटापिटा करून का होईना पण गुळ पळवण्यात धन्यता मानली. परिणामी संपूर्ण गाडी रिकामी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुळ पळवताना नागरिकांना महामार्गावरील सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा देखील विसर पडला त्यामुळे जिवा पेक्षा गुळ महत्वाचा झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेKurkumbhकुरकुंभAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस