शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

Video: "एकच वादा.. अजितदादा..." पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांचे जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:34 IST

स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार,

पुणे : गाडगीळ वाडा, कलमाडी हाऊस प्रमाणेच पुण्यातील राजकीय घडामोडींचे एकेकाळचे केंद्र असलेले बारामती होस्टेल आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या लगबगीने गजबजलेले पाहिला मिळाले. निमित्त होते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अनेक वर्षानंतर बारामती होस्टेलला दिलेली भेट.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची भेटी गाठी घेतल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी बारामती होस्टेलवर कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षांनंतर बारामती होस्टेल गजबजले. 

"एकच वादा.. अजितदादा..." ,"आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे.." , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

बारामती होस्टेलने आजवर अनेक स्थितंतरे पाहिली. काँग्रेसमधून शरद पवार यांची हकालपट्टी केल्यानंतर पवार हे आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना येथेच सामोरे गेले होते. दोन दिवस अगदी रात्री उशिरापर्यंत राज्यभरातून कार्यकर्ते येऊन पवार यांची भेट घेऊन आम्ही तुमच्याबरोबर असल्याची सांगत होते. पूर्वी शरद पवारही  बारामती होस्टेलवर सकाळी ९ च्या ठोक्याला कार्यकर्ते, लोकांना भेटत असत. पुणे, पिंपरी तसेच जिल्ह्यांमधील निवडणुकांसंबंधीच्या बैठका येथेच होत असत. महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी नेते येथेच अजित पवार यांची भेट घेत असत. येथेच अनेकांचे तिकीट फिक्स झाल्याचे नेत्यांना समजले होते. तर तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी येथे कुंड्या व इतर वस्तूंची आदळआपट करुन आपला रागही काही वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. पण गेल्या  काही वर्षांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामती होस्टेलवर येणे कमी केले. त्यामुळे कार्यकर्तेही इकडे फिरकेनात. महादेवराव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेक केल्याचा प्रकार ऑक्टोबर २०१६ घडला होता. त्यानंतर तब्बल साडेसहा वर्षांनी बारामती होस्टेलवर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. 

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार

मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा