पुणे-नगर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:33 IST2022-08-25T15:32:04+5:302022-08-25T15:33:46+5:30
कार दुभाजकावर आदळून शेजारील पत्र्यांना धडकली...

पुणे-नगर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जखमी
शिक्रापूर (पुणे) : येथे कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहे. येथील पुणे नगर महामार्गावरून चौघे मित्र त्यांच्या ( एम. एच. १२ एम. एफ. ६६६४) या कारमधून अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे चाललेले असताना त्यांची कार येथील दुभाजकावर आदळून शेजारील पत्र्यांना धडकली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक अंबादास थोरे, राकेश मळेकर यांनी घटनास्थळी जात पहाणी केली. दरम्यान, येथील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या अपघात अमोल संभाजी फुले (वय ३५) (रा. सासवड ) याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर वैभव सुभाष कुंभारकर (वय २८) व अनिकेत ऊर्फ बाबू शरद चौखंडे (वय २३) (दोघे रा. सासवड ) तसेच नितीन बबन देशमुख (वय ३१)( रा. केडगाव जि. अहमदनगर) हे तिघे जखमी झाले. याबाबत पोलीस नाईक अंबादास अश्रुबा थोरे (रा. शिक्रापूर ,ता. शिरुर जि. पुणे) पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.