शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Pune: एकाने बंदोबस्तात धिंगाणा घातला; दुसऱ्याने नशेत महिलेला उडवले, दारू पिऊन ऑनड्यूटी असणारे २ पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:10 IST

या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवेचे (वर्तणूक) उल्लंघन करणारे आहे. त्यानुसार दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

पुणे : ऑनड्यूटी दारूच्या नशेत वावरणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. एकाने भरती प्रक्रियेसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन करून धिंगाणा घातला, तर दुसऱ्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच नशेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडवले. या दोन्ही हवालदारांच्या वर्तणूकीची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पहिली घटना २१ मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात घडली. पुणे शहर पोलिस भरती २०२४-२५ ची लेखी परीक्षा सुरू असताना हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती इमारत क्रमांक १ मधील सेक्टर १ च्या बंदोबस्तासाठी करण्यात आली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या बंदोबस्ताची अचानक पाहणी केली. त्यावेळी सचिन जाधव याने कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळला. संशय आल्याने त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेत अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन केल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. तर, दुसरी घटना ९ मार्च रोजी घडली, ज्यामध्ये हवालदार संजय कराड याच्यावर कारवाई करण्यात आली. उंड्री पोलिस चौकीत ड्युटी अंमलदार म्हणून कार्यरत असताना कराड दुपारी दोन वाजता आपले कर्तव्य सोडून दुचाकीवरून काळेपडळ पोलिस ठाण्याच्या आवारात आला. यावेळी मद्याच्या नशेत त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पोलिस ठाण्यातील बाकड्यावर बसलेल्या एका महिला तक्रारदाराला धडक दिली. या धडकेत महिला किरकोळ जखमी झाली. त्यानंतरही शुद्धीवर नसलेल्या कराड याने तेथील लोकांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. वैद्यकीय अहवालात कराड याने देखील मद्यपान केल्याचे सिद्ध झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवेचे (वर्तणूक) उल्लंघन करणारे आहे. त्यानुसार दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Two Cops Suspended for Drunken Misconduct While on Duty

Web Summary : Two Pune police constables were suspended after separate incidents of drunken misconduct. One created a disturbance during recruitment duty, while another, intoxicated, hit a female complainant with his vehicle inside the police station premises. Both tested positive for alcohol.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकliquor banदारूबंदीWomenमहिलाSocialसामाजिक