शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर पाडल्यानंतर घरही पाडण्याच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 22:12 IST

पुण्यातील दत्तवाडीतील घटना;

पुणे : घरावर बसविलेल्या मोबाईल टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करुन पैसे न दिल्याने नगरसेवकपदाचा गैरवापर करुन महापालिकेत अर्ज करुन टॉवर पाडायला लावला. तसेच घरदेखील पाडून टाकणार अशी धमकी दिल्याने दत्तवाडीमधील संजय महादेव सुर्वे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संजय महादेव सुर्वे (वय ५३, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (वय २६) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२१ पासून २१ जून २०२१ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे यांनी आपल्या दत्तवाडी येथील महादेव बिल्डिंगच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. ते दत्तवाडी प्रभाग क्रमांक २९ मध्ये रहात असताना त्याबाबत दत्तवाडी प्रभाग क्रमांक ३० चे विद्यमान नगरसेवक आनंद रिठे यांनी महानगर पालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. सुर्वे यांनी पैसे न दिल्याने रिठे यांनी महापालिकेत अर्ज करुन त्यांच्या नगरसेवकपदाचा गैरवापर करुन १० जून रोजी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरील मोबाईल टॉवर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा आणून काढून टाकला. तसेच टॉवरनंतर त्यांचे राहते घरदेखील पाडुन टाकणार आहे, अशी धमकी देऊन आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांनी मानसिक त्रास दिला. रिठे यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून व टेरेसवरील मोबाईल टॉवर काढल्याने त्यांना मानहानी सहन झाली. तसेच घर पाडण्याच्या चिंतेने संजय सुर्वे यांनी सोमवारी त्यांच्या इमारतीमधील पौर्णिमा सायकल नावाचे सायकल दुरुस्तीच्या दुकानाच्या छताचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय सुर्वे यांन आनंद रिठे यांनी मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशी शशांक सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस