शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पिंपरीत खांबाला रिक्षा धडकून चालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:34 PM

डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास अपघात घडला

पिंपरी : पिंपरीतील डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास अपघात घडला. रस्त्यात असलेल्या विद्युत पथदिव्याच्या खांबाला रिक्षा धडकून झालेल्या या अपघातात एक रिक्षाचालक ठार झाला आहे. सतिश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पंडागळे हे रात्री डांगे चौकातून घरगुती समान घेऊन येत असताना हिंजवडी रस्त्यावर रस्त्यात मध्येच असलेल्या खांबाचा अंदाज न आल्याने रिक्षाची जोरदार धडक खांबाला बसली. या धडकेत काचेतून पंडागळे बाहेर फेकले गेल्याने त्यांचे डोके खांबावर आदळले तसेच ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

डांगे चौक हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून जागोजागी अर्धवट कामे ठेवण्यात आली आहेत. तसेच अद्यापही जुने विद्युत खांब हटविण्यात न आल्याने हा रस्ता रात्रीचा अतिशय धोकादायक झाला असल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. याआधीही गेल्या आठवड्यात याच खांबाला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला होता. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात