शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रास्तापेठेत बनावट ७७ हजारांच्या नोटांसह एकास अटक

By नितीश गोवंडे | Updated: December 23, 2024 17:13 IST

- गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

पुणे : बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पाेलिसांकडून चौकशी सुरू आहे.गौरव रामप्रताप सविता (२४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई लखन शेटे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ नगर पोलिसांचे पथकांकडून शुक्रवारी रात्री सराइतांची तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) करण्यात येत होती. वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सोमवार पेठ, रास्ता पेठेतील लाॅजची तपासणी करत होती. त्यावेळी एकजण रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच आरोपी गौरव तेथून पसार होण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. समर्थ पोलिस ठाण्यात गौरवला नेण्यात आले.त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली असून, त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय