Pune: दरोड्याच्या तयारीतील एकाला अटक; तीन अल्पवयीन युवकही ताब्यात

By नितीश गोवंडे | Updated: March 28, 2024 15:53 IST2024-03-28T15:51:55+5:302024-03-28T15:53:32+5:30

एका जणासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले...

One arrested in preparation for robbery Three juveniles in custody | Pune: दरोड्याच्या तयारीतील एकाला अटक; तीन अल्पवयीन युवकही ताब्यात

Pune: दरोड्याच्या तयारीतील एकाला अटक; तीन अल्पवयीन युवकही ताब्यात

पुणे : रहिवासी इमारतीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका जणासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहन गोविंद धुमाळ (२०, रा. झेड कॉर्नर, लक्ष्मी हाईट्स, मांजरी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार नामदेव रेणुसे यांनी फिर्याद दिली आहे.

२७ मार्च रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धुमाळ आणि त्याचे अल्पवयीन साथीदार भिलारेवाडी येथे रहिवासी इमारतीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धुमाळसह त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींजवळून पोलिसांनी दोन कोयते, मिर्ची पावडर आणि दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अनिल भोसले करत आहेत.

Web Title: One arrested in preparation for robbery Three juveniles in custody