शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

हडपसर येथे दीड वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 9:08 PM

पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून दीड वर्षाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपाणी भरण्यावरून झालेल्या वादातून घडला प्रकार

पुणे : पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून दीड वर्षाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील हिंगणे मळा येथे ही घटना गेल्या महिन्यात घडली आहे. पालकांना मुलगी पडली नसून, तिला फेकुन दिल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सोमवारी(दि.१२) हडपसरपोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सुरवी सुधीर कांबळे (वय दीड वर्ष) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश कुंडलिक लोंढे (वय ४५, रा. नवीन म्हाडा वसाहत, हिंगणे मळा, हडपसर) याच्यासह एका महिलेवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुलीचे वडील सुधीर कांबळे यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.  त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर कांबळे हे रंगकामे करतात. तर, रमेश लोंढे हा महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहे. दरम्यान कांबळे आणि लोंढे हे दोघेही नवीन म्हाडा वसाहतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांची घरे एकमेकांसमोर आहेत. ही इमारत चार मजल्यांची आहे. त्यांच्यात पिण्याचे पाणी भरण्यावरून गेल्या महिन्यात वाद झाले होते. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडण झाले. मात्र, त्यानंतर हे वाद मिटविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनीच २८ आॅगस्ट रोजी कांबळे यांची दीड वर्षांची   मुलगी सुरवी ही दुसऱ्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली. नागरिकांनी व पालकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात आले. सुदैवाने यात तिला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, मुलगी गॅलरीतून कशी कोसळली. याबाबत तिच्या पालकांनी शोध घेतला. त्यांचा लोंढे यांच्यावर संशय होता. त्यांनी चौकशी केल्यानंतर रमेश यांने मुलीला फेकुन दिल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सोमवारी हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHadapsarहडपसरPoliceपोलिस