शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने पकडले दीडशे कॉपी बहाद्दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:11 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्रची परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी गैरप्रकार करत ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्रची परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे. विद्यापीठातर्फे या कॉपीबहाद्दरांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात असल्या, तरी गैरप्रकार करणाऱ्यांकडे विद्यापीठाच्या यंत्रणेचे बारीक लक्ष असल्याचे समोर आले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असून त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या यंत्रणेतून सुटत नाहीत.

विद्यापीठाच्या परीक्षा १० एप्रिलपासून सुरू झाले असून आत्तापर्यंत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणााऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पकडले आहे. एकाच दिवशी ७४ विद्यार्थी कॉपी करताना विद्यापीठाच्या प्राॅक्टर्ड यंत्रणेने शोधले आहे. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी ग्रुप करून ऑनलाइन परीक्षा देत असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत असल्याचे समोर आले आहे.

--

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विद्यापीठाच्या इमेज प्रॉक्टर्ड यंत्रणेतून या विद्यार्थ्यांना पकडले. त्यांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असल्या तरी गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाचे लक्ष आहे.

- महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ