Pune | मंगळवारी पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:05 IST2023-02-06T18:03:55+5:302023-02-06T18:05:33+5:30
पुणे : वानवडी येथील शिंदे छत्रीजवळील पुलावरील जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने मंगळवारी (दि. ७) लष्कर भागातील पाणीपुरवठा बंद ...

Pune | मंगळवारी पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
पुणे : वानवडी येथील शिंदे छत्रीजवळील पुलावरील जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने मंगळवारी (दि. ७) लष्कर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर बुधवारी सकाळी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वानवडी शिंदे छत्री परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील हाय सर्व्हिस आणि २८५ ईएसआर टाकीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा बंद असलेला भाग :
लष्कर जलकेंद्र भाग, संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल परिसर, प्रभाग क्र. २५ मधील वानवडी गावठाण, एसआरपीएफ वानवडी, एस. व्ही. नगर, काळूबाई मंदिर परिसर सोलापूर रोड, सोपानबाग, उदयबाग, डाेबरवाडी व प्रभाग क्र. २१ मधील बी. टी. कवडे रोड.