शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:16 IST

शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते

कोरेगाव भीमा : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे भगवे झेंडे, दिंड्या, पताकांसमवेत शंभुराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन येणा-या शंभुभक्तांच्या गर्दीने आज संपुर्ण तुळापूर परिसर फुलून गेला होता. शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३५ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त छत्रपती शंभुराजांना पुजाअभिषेक, पोवाडे, व्याख्याने, पालखी मिरवणूक, साहसी मदार्नी खेळ, तसेच रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम झाले.      सकाळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुजाभिषेक करण्यात आला. तसेच व साखळदंडाचेही पुजन करण्यात आले. यावेळी हभप गणेश महाराज फरतळे यांचे व्याख्यानही झाले. त्यानंतर ११ वाजता पोलिस दलाच्या वतीने शंभुराजांना शासकीय सलामीही देण्यात आली. दरम्यान मदार्नी खेळ व लातूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रमही संपन्न झाला. तर दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर येथील कु.साईक्षा दिग्विजय पाटील व पुणे येथील सौ. गितांजली झेंडे यांचे शिवव्याख्यान झाले.  

      दरम्यान शंभुराजांना अभिवादन करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तुळापूरला भेट देत पुष्पहार अर्पण केला. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अ‍ॅड अशोक पवार, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील, यांच्यासह शंभू भक्तांनी तुळापूरला भेट देत शंभुराजांना अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव...छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांसह भगवे झेंडे हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिवसभर ओसंडून वाहत होता.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकmarathaमराठा