शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अबब! पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागांचे मूल्य २० हजार कोटींपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 12:52 PM

कोरोनामुळे कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.

ठळक मुद्दे'व्हॅल्यूएशन'चे काम सुरू : महापालिकेकडून सुरू आहे जागांचे पॉलिगन मॅपिंगमोकळ्या जागांचे आतापर्यंत १८ हजार कोटींचे मूल्यमापन

लक्ष्मण मोरे - पुणे : घटलेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. उत्पन्न वाढीसाठी पालिकेकडून अभय योजना आणण्यात आली असून सदनिका व गाळे विक्री केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने पालिकेच्या मालकीच्या १३ प्रकारच्या मालमत्तांच्या 'व्हॅल्यूएशन'चे काम सुरू केले आहे. त्यापैकी मोकळ्या जागांचे आतापर्यंत १८ हजार कोटींचे मूल्यमापन करण्यात आले आहे. आणखीही मोकळ्या जागा शिल्लक असून हा आकडा वीस हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या मालकीच्या भूखंडांसह अ‍ॅमेनिटी स्पेस, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, उद्याने, रुग्णालये, इमारती, सदनिका, रंगभूमी, नाट्यगृहे, मंडई, अग्निशामक केंद्र, क्रीडा संकुले आदी १३ प्रकारच्या मालमत्तांचे व्हॅल्यूएशन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याची सुरुवात मोकळ्या जागांपासून करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या जागांचे मुल्यमापन करण्यात आले आहे त्यांचे एकूण मुल्य १८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. आणखी ब-याच मोकळ्या जागांचे मुल्यमापन करण्याचे काम सुरु आहे.

पालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवर अतिक्रमणे होत असल्याचे दिसत आहे. बेकायदेशीरपणे टाकलेले  ‘ताबे’ काढण्यासाठी पालिकेला कायदेशीर लढाई लढावी लागते. तसेच पालिकेच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होतो. मालमत्तांचा गैरवापर होऊ नये याकरिता तसेच या जागांचा व्यावसायिक वापर वाढवित पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.केवळ मोकळ्या जागांचे मुल्य १८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. आणखी 12 प्रकारच्या मालमत्तांचे मुल्यमापन शिल्लक आहे. या सर्व मालमत्तांचे मुल्यमापन झाल्यानंतर हा आकडा  बाजारभावाप्रमाणे ५० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.====मालमत्तांचे पॉलिगन मॅपिंग  पालिकेच्या मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात आले असून आता त्याचे पॉलिगन मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या मॅपिंगद्वारे उद्यानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरीत मालमत्तांचे सर्वेक्षण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.====या सर्वेक्षणामुळे पालिकेच्या मालमत्तांवर झालेली अतिक्रमणे निदर्शनास येणार असून या जागा मोकळ्या केल्या जाणार आहे. खुला जागांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या सर्व मिळकती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहेत. मालमत्तांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे कामही सुरु आहे.====पालिकेच्या मालमत्ताइमारती ६३अ‍ॅमिनिटी स्पेस ३१भूखंड १८प्राथमिक शाळा २९३उद्याने २०१रुग्णालये ७५सांडपाणी प्रक्रिया केंद्र २४सांस्कृतिक केंद्र १४क्षेत्रीय कार्यालये १६अग्निशामक केंद्र १४क्रीडा संकुल ५२मंडई २५स्मशानभूमी ८१व्यावसायिक गाळे ३३४भूमी १६३५सदनिका २९४७ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या