शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ओम नमः शिवाय...! भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी, जन्माष्टमीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:02 IST

जन्माष्टमीनिमित्त ४०० किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन श्रीकृष्ण व विविध गोपालांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्री कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे ह्या दिवशी शिवलिंगावरती तसेच सभामंडप व परिसरामध्ये आकर्षक विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट व श्री कृष्णांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

गेले दोन तीन दिवसांपासुन भीमाशंकर व परिसरामध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. चौथ्या सोमवारची गर्दी पाहता शनिवार व रविवार गर्दी मोठ्या प्रमाणात होती. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सकाळपासूनच गर्दी अत्यंत विरळ होती. सोमवार (दि.२९) रोजी पहाटे साडेचार वाजता मंदीर उघडण्यात आले गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती जलाभिषेक करुण पुजा करण्यात आली यानंतर महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी एक वाजे पर्यंत गर्दीचा ओघ हा आंबेगाव व खेडच्या हद्दी पर्यंत होता यानंतर गर्दी कमी होत गेली. वादळी वारे व मुसळधार पडणार्‍या पावसामुळे येणारे भाविक हे दर्शन करून लगेच परतीच्या मार्गावर परतत होते.    शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. अनिल लबडे मिञ परिवार मंचर यांच्यावतीने ४०० किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन श्रीकृष्ण व विविध गोपालांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये झेंडू अस्टर चमेली शेवंती डीजी गुलछडी झिनी अशा रंगीबेरंगी फुलांचा वापर करून गाभारा सभा मंडप व परिसर सजविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरSocialसामाजिकJyotirlingaज्योतिर्लिंग