Pune: ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू, मोई फाट्याजवळ भीषण अपघात

By नारायण बडगुजर | Updated: January 23, 2024 19:12 IST2024-01-23T19:12:17+5:302024-01-23T19:12:30+5:30

चिखलीतील कुदळवाडी येथे मोई फाट्याजवळ सोमवारी (दि. २२) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला...

Old woman dies after being crushed under the wheels of a truck, horrific accident near Moi Phata | Pune: ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू, मोई फाट्याजवळ भीषण अपघात

Pune: ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू, मोई फाट्याजवळ भीषण अपघात

पिंपरी : भरधाव ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू झाला. चिखलीतील कुदळवाडी येथे मोई फाट्याजवळ सोमवारी (दि. २२) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकचालक सुखशांत व्यंकटराव कांबळे (३४, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपक बाळू गवारे (२३, रा. मोईगा, ता. खेड) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गवारे यांची ७८ वर्षीय आजी मोई फाट्याजवळील डायमंड चौकात होत्या. त्यावेळी सुखशांत कांबळे याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून दीपक यांच्या आजीला धडक दिली. यात ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कांबळे हा घटनास्थळी न थांबता निघून गेला. सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

Web Title: Old woman dies after being crushed under the wheels of a truck, horrific accident near Moi Phata