पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:34 IST2019-07-16T15:33:18+5:302019-07-16T15:34:24+5:30
पुण्यातील रविवार पेठेतील जुना वाडा आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काेसळला.

पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही
पुणे : पुण्यातील रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये असणारा जुना वाडा आज सकाळी 9.30 च्या सुमारास काेसळला. सुदैवाने वाड्यात काेणी नसल्याने कुठलिही जीवितहानी झाली नाही. वाडा पडल्याची बातमी कळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यता आले. त्यांनी वाहतूकीसाठी रस्ता माेकळा करुन दिला.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9.30 च्या सुमारास पुण्यातील रविवार पेठ येथील एक वाडा काेसळला. वाडा जुना असल्याने जीर्ण झाला हाेता. वाडा पडला त्यावेळी घरात काेणीही राहत नव्हते, त्यामुळे कुठलिही जीवित हानी झाली नाही. वाड्यात राहणारे कुटुंबिय आदल्या दिवशी रात्री इतर ठिकाणी राहण्यासाठी गेले हाेते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाड्याची पाहणी करत रस्ता वाहतुकीस माेकळा केला. हा वाडा पडल्याने त्याच्या शेजारी असलेले जुने घर देखील माेडकळीस आले आहे. त्यामुळे ते घर कधीही पडण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाकडून त्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. पडलेला वाडा हा जुना हाेता. त्याचे बांधकाम देखील लाकडी हाेते. घरात फारसे सामान देखील नसल्याने आर्थिक नुकसान झाले नाही.